क्रेडाईतर्फे मराठवाड्यातील सर्वात मोठ्या गृहप्रदर्शनाचा शुभारंभ

Foto
घर खरेदीची सुवर्णसंधी : मंत्री अतुल सावे

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): आज छत्रपती संभाजीनगर अनेक अँकर प्रोजेक्ट येत आहे. यामध्ये जेएसडब्ल्यू, टोयोटा, किर्लोस्कर, एथर यांसारख्या कंपन्या लवकरच येणार आहे. एक लाख कोटींची गुंतवणूक यामध्ये असणार आहे. इलेक्ट्रिक टीव्ही हब, बॅटरी, सोलार यासारखे अनेक प्रकल्प येणार असून यासाठी बाहेरून आपल्या शहरात साधारणतः तीन ते चार लाख लोक येतील त्यांना राहण्यासाठी फ्लॅट, घरे लागतील. मोठमोठी फाइव स्टार हॉटेल, क्रिकेट मैदान, दवाखाने लागणार आहे. आज केलेली गुंतवणूक ही भविष्यात संधी देऊन जाणार आहे, असे मत मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले.
क्रेडाईच्या वतीने ड्रीम होम एक्सपोचे बुधवारी (दि. १४) जाबिंदा ग्राऊंड येथे थाटात उद्घाटन झाले. यावेळी उद्घाटक म्हणून गृहनिर्माण विकास आणि इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री अतुल सावे प्रमुख पाहुणे लाभले. तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर समीर - राजुरकर, महाराष्ट्र क्रेडाईचे माजी अध्यक्ष राजेंद्र - जबिंदा, क्रेडाईचे अध्यक्ष संग्राम पटारे, माजी अध्यक्ष विकास चौधरी, इलेक्ट अध्यक्ष तथा कन्व्हेनर, क्रेडाईचे भास्कर चौधरी, क्रेडाई सचिव अजित बापट, क्रेडाई एक्सस्पोचे कोकनव्हेनर आशुतोष
एकाच छताखाली तीनशेहून अधिक गृहप्रकल्पाची माहिती
जबिंदा ग्राउंड येथे आयोजित एका छताखाली ३०० पेक्षाही जास्त गृहप्रकल्पांची माहिती यामध्ये मिळणार आहे. पंधरा लाखांपासून ते पाच कोटींपर्यंतचे चांगले फ्लॅट घर बंगले रो हाऊस पेंट हाऊस येथे उपलब्ध होणार आहे. यासाठी अनेक नामवंत बँका गृह फायनान्स देणार आहे. यामध्ये एसबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा यांचे स्टॉल या ठिकाणी आहेत. ग्राहकांना तात्काळ गृह कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
नावंदर, सुनिल बेदमुथा यांनी काम पाहिले. याप्रसंगी नितीन बगडिया, नरेंद्र जाबिंदा, सुनील पाटील, गोपेश यादव, राहुल तोबरे, गिरीश कुलकर्णी, व्यासराज जबंगी या एक्सपोचे सर्व काम पहात आहे. सर्व मान्यवरांचे आभार वुमनविंगच्या वैशाली चौधरी यांनी मानले. या प्रदर्शनाचे प्रायोजक एसबीआय बँक हे असून, प्लॅटिनियम प्रयोजक म्हणून मंजित प्राइड ग्रुप आणि विस्तार भूमी हे आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions